बदली पोर्टलवर नोंद असलेल्या युडीआयडी धारक दिव्यांग शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार बदलीसाठी प्राधान्य
नांदेड l प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मधील तरतूद क्रमांक 1.8 मध्ये 1.8.1 ते 1.8.20 चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांना बदलीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्राधान्यानुसार बदलीमध्ये सर्वात आगोदर युडीआयडीधारक दिव्यांग शिक्षक, जोडीदार, पाल्य गंभीर आजार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत व अशा एकूण 20 उपसंवर्गातील निकष पूर्ण करत असलेल्या आणि बदली पोर्टलवर नोंद केलेल्या शिक्षकांना निकषाच्या प्राधान्यातील उतरत्याक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार शासन निर्णयात बदलीचे प्राधान्य देण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 चे निकष पूर्ण करत होते अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट घेण्याकरिता अथवा बदलीचा लाभ घेण्याकरीता प्रथमत: बदली पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते. सन 2025 च्या बदलीमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये सहभाग घेण्याकरिता बदली पोर्टलवर न...
