Pre Monsoon Rains ; मान्सूनपूर्व पाऊस, वीज पडून हिमायतनगर येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू
हिमायतनगर। तालुक्यात शनिवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान हिमायतनगर शहरातील रहिवासी असलेले शेतकरी अजगर खान मिया खान वय ६२ वर्ष यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शहर परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते.
नांदेड जिल्ह्यात शुक्रवार पासून वातावरणात बदल झाला असुन, ढगाळ वातावरणामुळे वादळी वारे, विजांचा कडकडाट, होऊन मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडतो आहे, शनिवारी हिमायतनगर (वाढोणा) शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून, यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य कमानीखाली व सखल भागात पाणीच पाणी झाले होते. नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील अनेक सखल भागात नालीचे दुर्गंनधीयुक्त पाणी रस्त्यावर साचले असल्याचे पहावयास मिळत आहे. नगरपंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ना...

