Poste Ardhapur raided the illegal business ; पोस्टे अर्धापुर यांनी अवैध धंद्यावर छापा मारून 3,50,955/- रू मुद्देमाल केला जप्त – NNL
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पोनि श्री चंद्रशेखर कदम, पोस्टे अर्धापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी मागील तिन दिवसांत पोळा सणाचे अनुषंगाने अवैध दारू विक्रेते व धाबा चालवणारे 07 इसमांवर कार्यवाही करून, छापा मारून 3.50.955/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोळा सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन अर्धापुर पोलीसांकडुन अवैध दारू विक्रेत्यांमध्ये महाराष्ट्र धाबा, मालेगाव, महाकाली धाबा अर्धापुर येथुन व अवैध दारू विक्रेत्यांकडुन एकुण देशी दारू व विदेशी दारू मिळुन 30.955/-रू चा प्रोव्हिबीशन गुन्हयाचा मुद्देमाल, एक फोर्ड कंपणीची कार किंमती 3,00,000/- रू. एक बजाज कपणीची मोटार सायकल किंमती 20,000/- रू असा मिळुन 3,50,955/- रू चा मुद्देमाल जप्त करून दिनांक 31.08. 2024 रोजी एक ग...
