4cows die : घारापूर टी-पॉईंटजवळ बोलेरो पिकअप उलटून ४ गोवंशांचा मृत्यू
हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातून गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलीस गाडी दिसताच घारापूर टी-पॉईंटजवळ चोरीच्या संशयित गोवंशांची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप चालकांच्या घाई गडबडीने उलटल्याने चार गोवंशांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळी 4 वाजता घडली.
एम.एच. ३७ टी २६५९ क्रमांकाची बोलेरो पिकअप ही गाडी उमरखेडवरून हिमायतनगरमार्गे तेलंगणा राज्यात गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करत होती. अंदाजे 16 जनावरांना अतिशय दाटीवाटीने व निर्दयी पद्धतीने कोंबून नेण्यात येत होते. या बाबतची गुप्त माहिती हिमायतनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची गाडी पाहून घारापूर टी-पॉईंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली.
या दुर्घटनेत चार गोवंश अपघातात मरण पावले, तर बारा जनावरे किरकोळ जखमी झाली. जिवंत जनावरांना पवना येथील देवकृपा गोशाळेत हल...
