IMA ; आयएमए च्या वतीने १८ व १९ जानेवारी रोजी मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन
नांदेड l येथे येत्या १८ व १९ जानेवारी रोजी आयएमए नांदेड शाखेच्या वतीने एम.जि.एम इंजिनिअरींग कॉलेज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या दोन दिवसीय राज्यस्तरीत मेडीको लिगल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे यात देशभरातून कायद्याचे ज्ञान असलेली डॉक्टर मंडळी, तज्ञ वकील , वरीष्ठ पोलिस अधिकारी ,नगर पालिकेचे अधिकारी , निवृत न्यायाधीश याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित डॉक्टरांना वैद्यकीय सेवे संदर्भातील कायदे व संहीता याबाबतचे मार्गदर्शन करणार आहेत या परिषेदेचा लाभ हे आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर , वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व सर्व प्रकारची डॉक्टर मंडळी घेऊ शकणार आहेत अशी माहीती आयएमए नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर यांनी दिली आहे
याविषयी अधिक माहीती देतांना त्यांनी सांगितले की , डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना नियम व कायदे या बाबींचा प्रभाव जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठीची ही एक विशेष "मेडिक...
