Chief Minister Devendra Fadnavis : “मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली| भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक...
