Friday, June 26

Tag: One day’s salary for flood-affected farmers and decision of Zilla Parishad officers and employees

Zilla Parishad ; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसांचे वेतन महसूल व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांचा निर्णय

Zilla Parishad ; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसांचे वेतन महसूल व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांचा निर्णय

नांदेड, कृषी
नांदेड| ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा परिषद, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रत...
error: Content is protected !!