statue of Chhatrapati Shivaji Maharaj : गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने लक्ष वेधले
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ठिकठिकाणी शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या हर्षोल्हासात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान करून आपण समाजाचे काही देणं लागतो हे दाखवून देत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता.
गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य दिव्य अशी शोभायात्रा येथील श्र...
