Friday, June 26

Tag: on the Mahur-Kinwat National Highway; the motorcyclist died on the spot

Mahur Accident : माहूर–किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर

Mahur Accident : माहूर–किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार, कार चालक गंभीर

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर–किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून चारचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे (वय २९) हे वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको (क्रमांक एम.एच. २७ ए.आर. ९२१०) या वाहनाने गेले होते. परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमलप्रसाद मिश्रा (वय ६०, रा. सायफळ, ता. माहूर) हे शाईन कंपनीच्या मोटर सायकलवर (क्रमांक एम.एच. ए.जे. १५८९) प्रवास करत होते. धडकेनंतर मोटरसायकल ५०० मिटर दूर फेकली...
error: Content is protected !!