Sunday, July 5

Tag: on the eve of Shravan

Mahur Kailash Hill : श्रावणाच्या पूर्वदिनी कैलास टेकडीवर भाविकांची मांदियाळी

Mahur Kailash Hill : श्रावणाच्या पूर्वदिनी कैलास टेकडीवर भाविकांची मांदियाळी

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर | श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर असलेल्या कैलास टेकडीवर श्री दत्त भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. आज दि.२४ रोजी दर्श अमावास्ये निमित्ताने पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. यामुळे माहूर गडावरील मंदिर गर्दिने फुलले आहे. श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो. या महिन्यात माहूर गडावरील कैलास टेकडीवर सुद्धा अमावस्या व दर सोमवारी हजारो भाविक येत असतात. माहूर येथील कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्यंत जागृत ठिकाण आहे. दत्तात्रयांच्या पादुका येथे असून, भाविकांनी भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांना जलाभिषेक आणि आरती करून आपल्या...
error: Content is protected !!