Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्ता विकासावर भर द्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL
नांदेड| शालेय शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि आगामी शिक्षक बदली प्रक्रिया या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन विचारविनिमय केला. यावेळी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून बदली मागणाऱ्यांची रँडम तपासणी करून दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समाधानकारक नसून मुलांना लिहिता वाचता आले पाहिजे. गणिती क्रिया इयत्ता नुसार करता आल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेने याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगून यावेळी त्यांनी गटशिक्षणाधिका-यांचा आढावा घेतला.
आपल्या तालुक्यातील शैक्षणिक स्तर उंचावण्या...
