Poor quality work : हिमायतनगरच्या नडवा पूलावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू; डस्टमध्ये काँक्रिट, सोशल मीडियातून नागरिकांमध्ये संताप
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा नडवा पूल सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर केला जात असल्याचे, तसेच नियमानुसार आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्यांऐवजी ८ मिमी व १० मिमीच्या गजांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या हलगर्जी कामामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप पुलालगतच्या शेतकरी व गावकऱ्यांनी केला आहे.
हा पूल गावासाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र अशा पद्धतीने केलेले काम भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कामाची देखरेख करणारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता कानिदे व संबंधित अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गावकऱ्यांनी या कामाची तांत्रिक चौकशी तात्काळ कर...
