Justice protest march in Himayatnagar : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिमायतनगरात न्याय आक्रोश मोर्चा – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात दि. १० डिसेंबर मंगळवारी बांगलादेशी हिंदूसाठी न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच सर्व व्यापाऱ्यांनी बांधवानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन अत्याचाराचा निषेध करत या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावे. या प्रमुख मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
मानवाधिकार परिषदेने जागतिक स्तरावर हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची कधीच दखल घेतली नाही. बांगलादेशात हिंदूवरच नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायावर अनन्वित्त अत्याचार केले जात आहेत. तरीदेखील राष्ट्र व मानवाधिकार संयुक्त परिषद यावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहे. बांगलादेशात हिंदू संत, मंदिर, हिंदू संस्था असुरक्ष...

