Friday, May 15

Tag: on Ekadashi is fulfilled

MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण

MLA Prataprao Patil Chikhlikar : एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मागणी पूर्ण

नांदेड, धार्मिक
लोहा| एकादशीला पेंडू येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भक्तांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. चितळी ते हिप्परगा व पुढे पेंडू जिल्हा सीमेपर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता उभारण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते हिप्परगा येथे पार पडला. या रस्त्यामुळे दर एकादशीला पेंडूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे. हिप्परगा गावकऱ्यांनी विकासकामांसाठी सहकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन आमदारांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य ह.भ.प. मारोतराव महाराज हिप्परगेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रविण पाटील चिखलीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता शिवाजी राठोड, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, ल...
error: Content is protected !!