Ram Gita : प्रभू श्री रामचंद्रांच्या राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात ६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात
नांदेड| कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ व दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात हा राम गितांचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती, निवेदन प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून, निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे आहे. कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहंदळे, प्रख्यात गायिका आरती दिक्षीत, प्रख्यात आसावरी जोशी-rबोधनकर, सुप्रसिध्द गायिका प्रणोती ...
