ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत थाटात शुभारंभ – NNL
नांदेड| येथील फिनान्शियल क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या लक्ष्मीकांत जगलपुरे यांनी नांदेड शहरात दीड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून फिनान्शियल क्षेत्रात आपली सेवा दिल्यानंतर आता त्यांनी आपल्या ओम ॲडव्हायझरी अँड फायनान्शिअल सर्विसेसच्या कॉरपोरेट ऑफिसचा मुंबईत मान्यवरांच्या आणि कुंटुबियांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ केला आहे.
सद्यस्थितीत ओम ॲडव्हाएझरी अँन्ड फायन्साशिएल सव्हिर्सेस प्रा.लि. या कंपनीच्या मार्फत आम्ही सर्व प्रकारचे लोन, स्टॉक मार्केट गुंतवणूक सल्ला व ट्रेंडींग, म्युच्यूअल फंड ईन्हेस्टमेंटस् यासोबतच सर्व प्रकारचे विमा भरणा या सेवा पुरवितो असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच मुंबई करांना सुद्धा फिनान्शियल क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी उद्घाटन प्रसंगी दिली..
आपल्या आजवरच्या व्यावसायिक वाटचालीत आपल्याला आई-वडील, पत्नी सौ. ज्...
