किनवट पंचायत समिती मनरेगाच्या विभागाच्या कारभाराला जनता वैतागली – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या "मनरेगा" विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी (एपीओ), कनिष्ठ अभियंता व संगणक चालकांच्या कारभाराला आता जनता वैतागली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मागितल्यानंतर कसलाही प्रतिसाद मिळत नाही. जवळपास शेतकर्यांच्या विहिरी, पाणंदरस्त्यासह विविध विकास कामांचा कारभाराची चावी त्यांच्याच हाती असल्याने हा विभाग सर्वाधिक भ्रष्टाचाराचे कुरण ठरले आहे. पारदर्शी प्रशासनाचा आव आणणार्या गटविकास अधिकार्यांनी किमान शेतकर्यांची तरी लूट होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
किनवट पंचायत समितीच्या कार्यकक्षेत जवळपास चारशे विहिरींच्या आसपास अत्यल्प भूधारक, अल्पभूधारकांशिवाय अन्य लाभार्थी शेतकर्यांचा अंतर्भाव आहे. पाणंदरस्त्याचीही कामे मोठ्या प्रमाणात अाहेत. सहायक कार्यक्रम अधिकारी (ए...
