Wednesday, May 13

Tag: of Vithu Mauli and Varakreya

Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

Distribution of food to small children | श्री परमेश्वर मंदिरातर्फे विठू माउली आणि वारकऱ्यांची भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप – NNL

नांदेड
हिमायतनगर| आषाढी एकादशीचे औचित्य साधून शहरातील एका खाजगी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई आणि वारकऱ्यांची भूमिका साकारून टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. बालवारकऱ्यांची दिंडी येथील मंदिरात येताच श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने चिमुकल्या बालकांना खाऊचे वाटप करून अभिनंदन करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्ताने श्री परमेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक महापूजा संपन्न झाली तसेच मंदिरात दररोज सकाळी पुरोहित कांतागुरु यांच्या मधुर वाणीत गीता पठण सुरु आहे. आषाढी निमित्ताने शिवभक्त सुनंदा दासेवार व त्यांच्या सहकारी महिलांच्या वतीने पंढरपूरच्या विठुराया प्रमाणे श्री परमेश्वराच्या मूर्तीला सजविण्यात आले. दुपारी ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारो भावीक भक्तांनी जय जय राम कृष्ण हरी......
error: Content is protected !!