आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करणार- व्यंकट मुदीराज – NNL
नांदेड| मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. 16 जून 2024 रविवार रोजी सकाळी ठिक 12.00 वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा- बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा 2026 कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकार्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा म...
