Monday, May 25

Tag: of the Nadwa bridge is of substandard quality

Himaytnagar Nadwa Bridge : नडवा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे; चौकशी करून ठेकेदार व संबंधितावर कारवाई करा – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड

Himaytnagar Nadwa Bridge : नडवा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे; चौकशी करून ठेकेदार व संबंधितावर कारवाई करा – स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपुर ग्रामीण रस्त्यावर सुरू असलेल्या नडवा पुलाच्या बांधकामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या कामाची तात्काळ गुणनियंत्रण पथकाद्वारे खातेनिहाय चौकशी करून सर्व देयके थांबवावीत व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हिमायतनगर शहरातील नडवा पूल हा शासनाकडे नोंद असलेला तालुक्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा पूल असून, प्रधानमंत्री ग्रामसडक विकास योजनेअंतर्गत या पुलाचे काम सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात पुलाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर करण्यात येत असून, अंदाजपत्रकात नमूद केलेल्या लोखं...
error: Content is protected !!