Appointment of Praful Jadhav : प्रफुल जाधव यांची समनक जनता पार्टीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते तथा गोर सेनेचे दीर्घकाळ तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी बजावणारे युवा कार्यकर्ते प्रफुल जाधव यांची समनक जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी नुकतेच प्रफुल जाधव यांना समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय मुख्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. गोर सेना , गोरसिकवाडी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून गोर सेना संस्थापक प्रा. संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात प्रफुल जाधव यांनी दीर्घकाळ गोर सेना या सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून माहूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे विविध प्रश्नाबाबत थेट प्रशासनाशी भिडून केलेली सोडवणूक पाहून त्यांना व्यापक प्रमाणात जनसेवेची संधी देत राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यात आली...
