Wednesday, May 13

Tag: of Ram Navami; A Melodious Extravaganza by Legendary Artists

Sriram pahat : रामनवमी निमित्त ‘श्रीराम पहाट’ संगीत सोहळा उत्साहात; दिग्गज कलावंतांची सुरेल मैफल

Sriram pahat : रामनवमी निमित्त ‘श्रीराम पहाट’ संगीत सोहळा उत्साहात; दिग्गज कलावंतांची सुरेल मैफल

नांदेड, धार्मिक
नांदेड| रामनवमीच्या औचित्य साधत नांदेड येथे सलग चौथ्या वर्षी ‘श्रीराम पहाट’ या सुरमयी संगीत सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. पहाटेच्या मंगल वातावरणात सादर झालेल्या रामभक्तीपर गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सकाळी ६ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या संगीत पर्वात प्रशांत काळुन्द्रेकर (मुंबई), प्रज्ञा देशपांडे (पुणे), संज्योती जगदाळे (मुंबई) यांसारख्या नामांकित गायकांनी “श्रीराम चंद्र कृपाळू”, “राम जन्मला”, “अवध में राम आये हैं” यांसह अनेक गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. त्यांच्या सादरीकरणाला मंदार गोडसे, विवेक परांजपे, यश सोमण यांसारख्या कलावंतांनी संगीतसाथ दिली. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन अ‍ॅड. गजानन पिंपरख...
error: Content is protected !!