Friday, June 26

Tag: of Nanded district concluded in Mumbai

Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

Nationalist Congress Party : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नांदेड जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई | आज मुंबईतील वरळी येथील डोम (MNCI) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नांदेड उत्तर आणि दक्षिण जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान मा. अजितदादा पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करून पक्षाची सद्यस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत पक्षाची विचारधारा, कार्य आणि जनहिताचे धोरण तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले. ...
error: Content is protected !!