Sunday, June 28

Tag: of MPs and MLAs

“Healthy Women – Strong Families” : हिमायतनगरात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाची शानदार सुरुवात

“Healthy Women – Strong Families” : हिमायतनगरात खासदार-आमदारांच्या उपस्थितीत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाची शानदार सुरुवात

नांदेड, आरोग्य
हिमायतनगर (अनिल मादसवार) “घरातील नारी स्वस्थ राहिली तर संपूर्ण घर निरोगी राहते. पण तीच आजारी पडली तर कुटुंब त्रस्त होते. त्यामुळे माता-भगिनींनी कोणत्याही आजाराला अंगावर न काढता शासकीय रुग्णालयात तपासणी करून वेळेवर उपचार घ्यावेत,” असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 01 ऑक्टोबर) "स्वस्थ नारी – सशक्त परिवार" अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार नागेश पाटील आष्टीकर अध्यक्षस्थानी तर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांना सशक्त करण्याचा उद्देश - खासदार आष्टीकर म्हणाले की, “शासनाकडून हे अभियान महिलांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविले जात आहे. महिलांना निरोगी, सशक्त आण...
error: Content is protected !!