Monday, June 29

Tag: of Malpani mentally retarded school on the first day

Huge response to health camp : मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद -NNL

Huge response to health camp : मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या आरोग्य शिबीरास पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या  मुला-मुलींच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबिरास  गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरासाठी मुंबई येथील तब्बल ३५ तज्ञ डॉक्टरांची टिम दाखल झाली आहे. यावेळीही आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर. आर. पटवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज, धर्मादाय उपआयुक्त ममता राखाडे, धर्मादाय सहआयुक्त एच. के. शेळके, लातूर येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जि.प. चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत स...
error: Content is protected !!