The forest department of Kinwat did not find the leopard killed : किनवटच्या वनविभागाला अपघातात ठार बिबट्याचा शोध लागेना, वन विभागाची निष्क्रियता की कुंभकर्णी झोपेचे सोंग ? -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वन विभागाच्या सारखणी भागातील वडोलीच्या जंगलात हनुमान मंदिरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असेलल्या रस्त्यावर रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीला बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बिबट्या जागेवरच गतप्राण झाला होता. बिबया मयत झाल्याचे समजताच बघण्याची गर्दी केलेल्या अनेकांनी बिबट्या जवळ छायाचित्र काढले होते. काही जागरूक नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे कर्मचारी खूप उशिरा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी घटनास्थळी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्या गायब झाल्याचे समोर आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड व त्यांची सर्व टीम 27 ऑक्टोबर पासून आजपर्यंत म्हणजेच सोळा दिवसापासून बिबट्याच्या शोधात आहेत. पण अजूनही गाढ झोपेत असलेला वन विभागाला ब...
