परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटनासाठी पोलीस अधीक्षकांचे अधिपत्याखाली विशेष पथकांचे गठन -NNL
नांदेड| पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत स्वतंत्र बैठका घेऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा सर्व व्यवसायांच्या निर्मूलनासाठी त्यांना दिनांक 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
त्याचप्रमाणे, हातभट्टी दारूचे निर्मूलनासाठी दिनांक 3 ऑगस्ट व 10 ऑगस्ट रोजी परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'मासरेड' चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी, संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उपाधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी भाग घेतला होता.
अवैध व्यवसायांच्या उच्चा...
