illegal business seized : अवैध व्यवसाय विरोधी अभियानाच्या पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया, 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड परिक्षेत्रात पोलीस विभागाने 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१' सुरु केले असून, पहिल्या आठवडयात सुमारे 400 कारवाया करून तब्बल 1 कोटीहून अधिक रकमेचा मुद्येमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही दिनांक १ मे ते ३१ मे, 2025 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान-१' चे अंतर्गत करण्यात आले आहे.
नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ' अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1' चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस ...
