Sunday, May 31

Tag: of Himayatnagar was a success

Shankar Pat competition : हिमायतनगरचा श्री परमेश्वर यात्रेतील पट दणाणला; शंकर पट स्पर्धेने मोडले उत्साहाचे सर्व विक्रम !

Shankar Pat competition : हिमायतनगरचा श्री परमेश्वर यात्रेतील पट दणाणला; शंकर पट स्पर्धेने मोडले उत्साहाचे सर्व विक्रम !

कृषी, नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा नगरीतील ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिर यात्रेत रंगलेली भव्य शंकर पट स्पर्धा यंदा जल्लोष, थरार आणि विक्रमी सहभागामुळे विशेष ठरली. परंपरा, प्रतिष्ठा आणि पराक्रमाचा संगम असलेल्या या सोहळ्याने सलग तिसऱ्या वर्षी “न भूतो न भविष्यती” अशी छाप उमटवत संपूर्ण तालुक्याला रोमांचित केले. स्पर्धेच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते शर्यतींचा शानदार शुभारंभ झाला. यावेळी नायब तहसीलदार श्री. पठाण, मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी आनंता देवकते तसेच शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सचिव श्यामसुंदर पाटील, कोशाध्यक्ष प्रवीण शिंदे, सहसचिव गजानन हार्डपकर, नारायण माने आदीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सकाळी दहापासूनच पटाच्या मैदानावर प्रेक्षकांचा अक्षरशः महासागर उसळला होता. धुळीचे लोट उडवत झं...
error: Content is protected !!