Sunday, June 28

Tag: of hectares of agriculture

Heavy rains in Kandhar : कंधार तालुक्यात पावसाचा रौद्ररूप हजारो हेक्टर शेती बाधित : कोट्यवधीचे नुकसान

Heavy rains in Kandhar : कंधार तालुक्यात पावसाचा रौद्ररूप हजारो हेक्टर शेती बाधित : कोट्यवधीचे नुकसान

कृषी, नांदेड
कंधार, सचिन मोरे| तालुक्यात २७ ऑगस्टच्या रात्री पासून २८ ऑगस्टच्या संध्याकाळ पर्यंत पावसाने रौद्ररूपधारण केले असून यामुळे तालुक्यातील २८ गावात पाणी शिरले आहे. सहा जनावरे पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत. तर जाकापुर व भिकमारी ही दोन गावे पुराच्या पाण्याने वेढले गेले आहेत. त्याच बरोबर २१ गावाचे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील पुलावरून मन्याडीचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आठ दिवसापूर्वी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन बाधित झाली होती. यात शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. ती परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी रात्री पासून पावसाने ...
error: Content is protected !!