health camp at Tamsa : तामसा येथे शेकडो रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ — दुसऱ्या शिबिरालाही उस्फूर्त प्रतिसाद
हदगाव, गौतम वाठोरे| दत्ता मेघे उच्च शिक्षण व संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (वर्धा) यांच्या विद्यमाने आणि हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील तामसा येथे २६ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तामसा व परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर पाटील चाभरेकर होते. या वेळी मंचावर विकास देवसरकर, बबन कदम, युवा जिल्हाध्यक्ष संदेश सूर्यवंशी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शितल भांगे, हिमायतनगर तालुका अध्यक्ष रामभाऊ ठाकरे, मंचक कदम, अशोक पवार, पांडुरंग...
