CEO Meenal Karanwal : मतदान प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल -NNL
नांदेड| मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो वापरणे ही आपल्या लोकशाही प्रणालीतील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले.
जिल्हयातील नऊ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जनजागृतीसाठी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्य...
