A clever move by Congress : काँग्रेसची चाणाक्ष खेळी कोणाला तारक ठरणार, मतदारांत उत्सुकता -NNL
राज्यामध्ये विधान सभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात विधान सभेसोबत लोकसभेची पोटनिवडणुकही होत आहे. जिल्ह्यात ९ मतदार संघात विधान सभेची निवडणूक होत असली तरी सर्व मतदारांचे लक्ष नांदेड लोकसभा, भोकर आणि नांदेड उत्तर या मतदार संघाकडे लागले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने यावेळी चाणाक्षपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निकालाची सर्वानाच उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागल्याने आता विधान सभा निवडणुकीत काय होणार ही उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे. नांदेडमध्ये विधान सभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपामध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यात आजवर काँग्रेस पक्षाची धुरा चव्हाण...
