Hadgaon City : हदगाव शहर चिखलाचे शहर व खड्ड्यामुळे ओळख नागरिक व विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील काही प्रतिष्ठाच्या प्रभागातच रोडचे नालीचे कामे करण्यात आल्याने शहरातील अतर्गत रोड वर निधी न टाकल्या मुळे चिखलासह मोठ मोठे जीवघेणी खड्डे पडलेले आहे तसेच हदगाव तालुक्यातील काही प्रमुख रोड वर विविध योजना द्वारे शासनाच्या निधी खर्च करण्यात आला. माञ रोडचा दर्जा पाहता हे काम निव्वळ थातुर-मातुर करण्यात आल्याने या संबधी माञ विरोधक व सत्ताधारी माञ या बाबतीत 'चुप्पी 'साधली असल्या मुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यातयेत आहे. यामुळे शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना हा प्रवास चिखलात व खड्ड्यातून करण्यात येत असल्याने हे तालुक्याच्या नेतृत्वच्या राज्यकीय दृष्टीने भूषणवाह नाही. अशी चर्चा शहरात व तालुक्यात ऐकवायास मिळत आहे.
हदगाव शहर चिखलाच व खड्ड्याच शहर म्हणून ओळख होतांना दिसुन येत आहे. हदगाव शहरात जानकीलाल राठी चौक ते माजी खा. वानखेडे यांचे निवास्थान पर्यंत गेल्य...
