Friday, May 15

Tag: of Chaturmasa

Significance of Chaturmasa : चातुर्मासाचे महत्त्व

Significance of Chaturmasa : चातुर्मासाचे महत्त्व

धार्मिक, लेख
चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात निद्रा घेत असतो, तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात. चातुर्मासाचे विविध दृष्टीकोनातून असलेले महत्त्व या लेखातून जाणून घेऊया. १. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ - आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात. २. श्रावण मास...
error: Content is protected !!