Wednesday, May 13

Tag: not for selling

voting, not for selling : मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही – तरच लोकशाही वाचेल

voting, not for selling : मतदान करण्यासाठी आहे, विकण्यासाठी नाही – तरच लोकशाही वाचेल

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| २०१४ नंतरच्या आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय परिस्थितीची समीक्षा करताना सद्यस्थितीची भारतीयांना जाणीव करून देत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेतील संदिग्धपणाला स्पष्ट करीत " मत दान करण्यासाठी आहे ,विकण्यासाठी नाही, तरच लोकशाही वाचेल , " असे सुप्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे दिल्ली यांनी आपले परखड मत व्यक्त केले. परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प "भारतीय लोकशाहीचे भवितव्य" या विषयावर गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अशोक वानखेडे दिनांक १३ जुलै रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ,नांदेड येथे बोलत होते. यापुढे बोलताना - बिहार राज्यातील २० % मतदार शासनाच्या प्रमाणपत्राच्या खेळात कमी होणार असून हाच प्रयोग संपूर्ण देशात सुरू होण्याची त्यांनी शक्यता वर्तवली. लोकसभेमध्ये मतदारांनी ४०५ चा आकडा पार होऊ दिला नाही. यावरून मतदार जागृत असल्या...
error: Content is protected !!