NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| सतत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पाऊसामूळे किनवट तालुक्यातील अनेक घरात व शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अणूषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस श.प.पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे कि, शेतक-यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न आणता सरसकट शासनाची मदत जाहीर करण्यात यावी तथा झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेती व घरामध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचा मोबदला नागरीकांना देण्यात य...
