NCP’s protest movement ; राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन – NNL
नांदेड| राज्यातील महायुती सरकारने अनेक उद्योगधंद्दे गुजरात राज्यामध्ये पळविले आहेत, अनेक धोरणे नागरिकांच्या विरोधात राबविल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी ग्रामीणचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी युवक-शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.8 ऑक्टोबर रोजी महायुती सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करून महाराष्ट्रातील उद्योग धंद्दे गुजरातमध्ये पळवून नेवू नका आदी स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकार सर्व क्षेत्रामध्ये निष्क्रीय ठरले असून मोठ्या उद्योगपतीनाच अधिक श्रीमंत करण्याच...
