OBC warriors : ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडवा यासाठी हिमायतनगरात गुरुवारी रास्तारोको आंदोलन -NNL
हिमायतनगर| वडीगोद्री, अंतरवाली सराटी, नांदेड आय. टी. आय. कॉर्नर येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी सुरु केलेले ओ.बी.सी. आरक्षण मागणीचे उपोषण २४ तासाच्या आत सोडविण्यात यावे. अन्यथा उपोषण सोडविण्याच्या मागणीसाठी दि. २६ गुरुवारी सकल ओ.बी.सी. समाजाकडून हिमायतनगर शहराजवळील मुख्य कमानीजवळ रस्ता रोका आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शासनाने सुरु केलेले ओ.बी.सी. व मराठा समाजातील आरक्षणा वरील वाद त्वरीत संपुष्ठात आणावा. शासनानाने सुरू केलेला ओ.बी.सी व मराठा समाजातील वाद-विवाद संघर्ष त्वरीत थांबवून आरक्षणाचा निकाल ओ.बी.सी.चे आरक्षण अबाधित ठेवून सोडविण्यात यावा. ओ.बी.सी.मध्ये इतर समाजाची होत असलेली घुसखोरी थांबवावी. वडीगोद्री येथे ओबीसी योध्दे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे अंतरवाली सराटी अॅड. मंगेश ...
