देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
नांदेड l केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कर्मचारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताला बाधा आणणार्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार व शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधी पुतळ्यापासून नांदेड जिल्हा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात कामगार विरोधी धोरणे रद्द करा, कामगार एकजुटीचा विजय असो आदी घोषणांनी नांदेड दणाणुन सोडले होते.
देशभरातील 11 राष्ट्रीय संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आज 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती. नांदेडमध्ये कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यापासून छ.शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हा परिषदेवर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्यांनी जिल्हाधिकार्यांसह, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यक...
