National school baseball : राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबिराची सांगता व स्पर्धेची तयारी
नांदेड| आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा हौसी बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीय स्तर शालेय बेसबॉल (School Baseball) (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 9 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे संपन्न झाले आहे.
या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी,2025 या कालावधीत नांदेड येथे संपन्न होणार असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. या संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक मुले संघासाठी ज्ञानेश काळे (सातारा) व मुली संघकरीता आनंदा कांबळे (नांदेड) हे आहेत तर संघव्यवस्...
