खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड पोलीसांनी केली अटक -NNL
नांदेड। खुन व मोक्का गुन्हयातील दिड वर्षापासुन फरारी आरोपीचा शोध घेवुन नांदेड गुन्हे शोध पथकाच्या पोलीसांनी अटक केली आहे, या कार्यवाहिबद्दल अभिनंदन केले जाते आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याचा आदेशीत केल्याप्रमाणे उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील व पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक वजिराबाद अधिकारी सपोनि. राजु वटाणे, पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे, पोकॉ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे, रमेश सुर्यवशी, बालाजी कदम असे दोन्ही पथक मिळुन पोलीस उप विभाग इतवारा व नांदेड शहर हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेत असताना दोन्ही पथकांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण हदीत खुन गुन्हयातील एक आरोपी धनेगाव नवीन पुल खाली थांबलेला आहे अशी माहिती मिळाली. मिळाल...
