Nanded Municipal Corporation will set up 23 water recharge projects in the city : नांदेड महानगरपालिका उभारणार शहरात २३ जलपुर्नभरण प्रकल्प – NNL
नांदेड| नांदेड शहरात उन्हाळ्यात होणारी पाणी टँचाई व पावसाळ्यामध्ये साचून राहत असलेले पाणी या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणुन महानगरपालिकेने या पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणी एकुण २३ भुजलधारा / जलपुनर्भरण (Rain Water Harvesting) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची सुरुवात म्हणून दिनांक ०६.०८.२०२४ रोजी स्टेडीयम परीसरातील डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे तयार केलेल्या भुजलधारा प्रकल्पाचे उदघाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी यावर्षी पर्यावरण संवर्धनासाठी नांदेड शहरात हरित नांदेड ही विशेष मोहिम हाती घेतली असुन या उपक्रमात विविध सामाजिक संस्था व नांदेडकरांची त्यांना साथ मिळत आहे. या पासाळ्यात एकूण ३० सामाजिक संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने जवळपास २५ हजार झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन केले ...
