Nanded MP Vasantrao Chavan : प्रतिकूल परिस्थितीत निवडणुका जिंकणारा नेता गेला -NNL
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन अनपेक्षित नसले तरी दुःखदायक निश्चित आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक मृदुभाषी, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी आपल्यातून गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील जी राजकारणातील परंपरागत घराणी आहेत त्यातील बळवंतराव चव्हाणांच्या घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे वसंतराव सत्तेच्या परिघात वावरत असतानाही कधी घमेंडी झाले नाही की कधी त्यांनी उद्धटपणा दाखविला नाही. ज्या काळात त्यांची पक्षाला अत्यंत गरज होती त्या काळात त्यांना नियतीने हिरावून नेले हे अत्यंत दुर्देवी आहे.
नायगाव सारख्या अत्यंत ग्रामीण भागात आपली राजकीय कारकिर्द सुरु करणारे वसंतराव सलग २४ वर्षे नायगावचे सरपंच होते. बळवंतराव चव्हाण आमदार असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. परंतु केवळ राजकीय वारसाच्या बळावर त्यांनी आपली कारकिर्द पुढे नेली नाही तर जनसामान्यात वावरत असताना लोकांच्या क...
