Municipal Corporation ; अनधिकृत जाहिरात होडींगवर महापालिकेची धडक कारवाई
नांदेड l नांदेड शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डीग्जचा सुळसुळाट झाल्याने महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दि.१०.१०.२०२५ रोजी पालिकेच्या पथकाने *उपआयुक्त स.अजित पालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत जाहिरात होर्डीग्जवर धडक कारवाई करत तब्बल ४० अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकण्यात आले आहेत.
महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण ११८ ठिकाण निश्चित केले असुन प्रत्येक ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असुन त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगर पालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेतार्फत शहर होर्डीग्ज मुक्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
...
