Mp Ashekrao Chavan | संधी मिळेल तेथे नांदेड, मराठवाड्याला प्राधान्य ! संघर्ष करावा लागला तरी विकासासाठी मागे हटणार नाही : खा. अशाेकराव चव्हाण -NNL
नांदेड,अनिल मादसवार| मुख्यमंत्री किंवा विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना नांदेड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आग्रही भूमिका घेतली. आजही आपले प्राधान्य मराठवाडा आणि नांदेड हेच आहे. यासाठी काही वेळा संघर्षही करावा लागला. मात्र, मराठवाड्याच्या विकासासाठी आपण आपली सर्व शक्ती प्रत्येकवेळी पणाला लावली आणि विकासाचे प्रकल्प मार्गी लावले असे सांगत माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी नांदेड आणि मराठवाड्याचा विकास हाच आपला अजेंडा असल्याची भूमिका आज पुन्हा अधाेरेखित केली.
राज्याच्या जलसंस्कृतीचे जनक आणि मराठवाड्याचे आधुनिक भगीरथ तसेच माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने आणि दैनिक सत्यप्रभाच्या वतीने आयाेजित कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण साेहळ्याचे आयाेजन आज (दि. 14) कुसुम सभागृहात करण्यात आले हाेते. त्यावेळी...
