Friday, May 15

Tag: MLAs are still there because

Mla Prataprao Patil ; पाच वेळा पक्षांतर तरीदेखील जनतेच्या आशीर्वादामुळेच आमदार – आमदार प्रताप चिखलीकर

Mla Prataprao Patil ; पाच वेळा पक्षांतर तरीदेखील जनतेच्या आशीर्वादामुळेच आमदार – आमदार प्रताप चिखलीकर

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे। मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस जिंकलो तर काही वेळेस पराभव देखील पत्कारला. माझे वडील काही आमदार खासदार नव्हते तरीदेखील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील गरीब कष्टकरी जनता माझ्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली. मतदारसंघाच्या विकासासाठी व काही राजकीय अडचणीमुळे मला वारंवार पक्ष बदलावे लागले तरीदेखील जनतेचे माझ्यावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या प्रेमामुळेच तीन वेळेस आमदार, एक वेळेस खासदार म्हणून यशस्वी कामगिरी बजावू शकलो. असे भावनिक उद्गार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काढले. तालुक्यातील गंगनबीड येथे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे यांच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळ्याचे व मेळाव्याचे भव्य आयोजन दि २८ जुन रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील ...
error: Content is protected !!