Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा
किनवट,परमेश्वर पेशवे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनवट व गोकुंदा शहरात प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम जय श्री रामाचा जयघोष करत, गजरात साजरा करण्यात आला. परिणामी अवघी किनवट नगरी दणाणली होती.
भगव्या पताका, भगव्या झेंड्यांनी अवघे शहर भव्यमय झाले होते. दरम्यान शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिरात लोकनेते आमदार भीमराव केराम यांनी श्रद्धा भावाने प्रभू श्री रामाची पूजा केली. सकाळपासूनच प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रांग लागली होती. मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील रामभक्तांनी श्रीराम भक्त मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले. दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवा नेतृत्व मुसाखान यांनी बुंदी...
