Wednesday, May 13

Tag: Mayor Kavita Mule’s appeal

“डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

“डीजे नव्हे, विचारांचा जल्लोष करा!” — महापौर कविता मुळे यांचे आवाहन

नांदेड, राजकीय
नांदेड| महापुरुषांच्या जयंती उत्सवाला योग्य दिशा देत डीजे मुक्त व व्यसनमुक्त साजरीकरणाचा संदेश देणाऱ्या जयंती मंडळांचा नांदेडमध्ये सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून “उत्सवात गोंगाट नव्हे, विचारांचा वारसा जपा” असा ठाम संदेश समाजाला देण्यात आला. मराठी नाऊ फाउंडेशन आणि समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेविरहित पद्धतीने साजरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महापुरुषांच्या जयंती हा केवळ उत्सव नसून विचारांचा वारसा पुढे नेण्याची संधी आहे. डीजेच्या आवाजात आणि व्यसनांच्या आहारी जाऊन साजरी होणारी जयंती समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य ...
error: Content is protected !!