Mata Sahebdevji : माता साहेबदेवजी यांच्या 344 व्या जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ!
नांदेड| येथून जवळच असलेल्या गुरुद्वारा माता साहेब, मुगट परिसर येथे शनिवारी सकाळी "माता साहेब देवाजी" यांच्या 344 व्या जन्मोत्सव कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच दिवान व कीर्तन दरबार कार्यक्रमास सकाळ पासून प्रारम्भ झाले. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे.
शनिवारी सकाळी गुरुद्वारा माता साहेब येथे श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पाठ सुरु करण्यात आले. नंतर श्री गुरु ग्रन्थ साहेब यांची विधिवत यात्रा काढून मुख्य दिवान हाल मध्ये श्री गुरु ग्रन्थ साहेब यांना प्रकाशमान करण्यात आले. जन्मोत्सव सोहळ्याचे रीतसर उदघाटन तखत सचखंड श्री हजुरसाहिब येथील मीत ग्रंथी भाई गुरमीत सिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तर यावेळी संतबाबा नरिंदर सिंघजी करसेवा वाले, संतबाबा बलविंदरसिंघजी करसेवा वाले, गुरुद्वारा माता साहेबचे मुख्य जत्थेदार संत बाबा तेजासिंघजी यांची मुख्य उपस्थिती होती. तसेच पंजाबहुन आलेल्या निहंग सिंघा...
